समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लांबणीवर

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर (Nagpur Mumbai Samridhi Highway) काही ठिकाणी उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे असून त्याला इजा पोहोचली आहे. याशिवाय वन्य जीव उन्नत मार्गाचे कामही अपूर्ण असल्याने समृद्धी महामार्गाचा उदघाट्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

राज्य सरकारने २ मी रोजी समृद्धी महामार्गाच्या २१० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते समृद्धीचे उद्घाटन होणार होते. मात्र, आता नवीन पद्धतीच्या सुपर स्ट्रक्चरच्या कामामुळे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे.

आर्च पद्धतीचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील १०५ पैकी काही आर्च स्ट्रीप्सना अपघातात हानी पोहोचली आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करुन नवीन पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. तसेच वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही.

नागपूर-मुंबई (Nagpur Mumbai) ७१० किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) उभारणी एमएसआरडीकडून (MSRD) सुरू आहे. त्यातीलच नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शुक्रवारी पहिल्या टप्याची पाहणी करुन २ मे रोजी लोकार्पणाची घोषणा केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *