'स्मार्ट' रस्त्यांचे नमुने गेले मुंबईला ; थर्ड पार्टी ऑडिट सुरू

'स्मार्ट' रस्त्यांचे नमुने गेले मुंबईला ; थर्ड पार्टी ऑडिट सुरू
Vijay Dhurandhare

औरंगाबाद - aurangabad

स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या (mumbai) पथक सलग दुसऱ्या दिवशी शहरात विविध ठिकाणी भेट देत होते. पथकासोबत स्मार्ट सिटीचे अभियंता होते. मनपा प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या तर्फे तयार होणारे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे असावेत यासाठी आयआयटी मुंबईकडून थर्ड पार्टी ऑडिट (Third Party Audit) करण्यात येत आहे. 

प्राध्यापक डॉ. धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयआयटी मुंबईच्या पथक दोन दिवस शहरात पाहणी करत होते. स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, किरण आढे, कनिष्ठ अभियंता नेत्राप्रभा जाधव, प्रकल्प सल्लागार यश इंनोवेशन्सचे फारुकी झफीर आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पहिला टप्प्यात शहरात २२ रस्ते तयार करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी तज्ञांचा पथकाने सर्वात आधी कांचनवाडी येथील रेडीमिक्‍स प्लांटला भेट दिली.

तिथे त्यांनी रस्ते बांधकाम साहित्याची तयार करण्याची प्रक्रिया तपासली. त्यांनी सूचना केली की मिक्स तयार झाल्यानंतर एका तासाचा आत वापरला गेला पाहिजे. जर त्यापेक्षा उशीराने आलेला साहित्य नाकारले गेले पाहिजे. पथकाने नवीन रस्त्याचे सँपल क्यूब घेतले होते. त्या क्यूबला तोडून त्याची मजबूती तपासली. यावेळी त्यांनी टेस्टिंग संबंधित कागदपत्रे सुद्धा तपासले. त्यानंतर पथकाने पडेगाव, माऊली मेडिकल ते भावसिंगपुरा कमान, एसबीओए, पिसादेवी, शिवछत्रपती महाविद्यालय ते हायकोर्ट आणि पारिजात नगर येथे तयार होत असलेल्या नवीन रस्त्यांची व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. 

रोड आणि फुटपाथ तयार करण्याचे काम सोबतच हाती घेतले पाहिजे जेणेकरून पुन्हा तो रस्ता खोदावा लागणार नाही. कन्स्ट्रक्शन जॉइंटसाठी एपॉक्सी ट्रीटमेंट करून करण्यात यावे अशी ही सूचना त्यांनी दिली.


आयआयटी मुंबईच्या पथकाने तयार होत असलेल्या रस्त्याचा एक सँपल तुकडा काढलेला आहे. या नमुन्याची तपासणी आयआयटीच्या प्रयोगशाळेत होणार आहे, असे डॉ. धर्मवीर सिंग यांनी सांगितले. झालेल्या पाहणी व तपासण्याची विस्तृत अभ्यास करून तज्ञ औरंगाबाद स्मार्ट सिटीला अहवाल देणार आहे ज्यानुसार कंत्रादारांकडून कार्य करून घेण्यात येईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com