बनावट कागदपत्रांआधारे प्लॉटची विक्री

नऊ लाखांचा गंडा
बनावट कागदपत्रांआधारे प्लॉटची विक्री

औरंगाबाद- Aurangabad

बनावट कागदपत्रांआधारे प्लॉटची विक्री करून 9 लाखांचा गंडा घालणार्‍या तिघांना सिटीचौक पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले.

शेख नदीम शेख हसन (रा. जयसिंगपुरा), सतिष प्रकाश दाभाडे (रा. भावसिंगपुरा) आणि रतन बन्सी धोत्रे (रा. भुजबळनगर) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे अशाच एका फसवणुकी प्रकरणात आरोपी हे अटकेत होते. या प्रकरणात नसीमबानेा अजीज पठाण (36, रा. तक्षशिलानगर जुना मोंढा) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीचे मावस भाऊ उबेद खान (रा. उस्मानपुरा) आणि शेख अवेज अहेमद अब्दुल हफीज अहेमद (रा. शरिफ कॉलनी) यांनी सामाईकरित्या हडको येथील मुज्जफरनगर मध्ये 750 चौ. फुटाचे घर खरेदी केले होते.

सन 2019 मध्ये ते घर त्यांना 23 लाखात विक्री करायचे होते. त्यामुळे त्यांनी कदीर पटेल (रा. हर्सुल) यांना घर विक्री करायचे असल्याचे सांगितले. त्याने प्लॉट खेरदी विक्री करणारा एजंट सालेह बिन खालेद ऊर्फ सलमान चाऊस (रा. शहाबाजार) याला सांगितले. सालेह बिन खालेद याने ही बाब मीत्र शेख रईस (रा. कोहीनुरकॉलनी) याला सांगितली. त्याने घर खरेदी करण्यासाठी सय्यद शहाबोद्दीन (रा. सिटीचौक) याला आणले. शहाबोद्दीन याने घर खरेदी करण्यासाठी अवजे खान यांना 14 लाख 50 हजार रुपये दिले व उर्वरित आठ लाख 50 हजार रुपयांच्या बदल्यात बीड बायपास गट क्रं. 147 मौजे बाळापुर येथील प्लाट क्र.11 देतो असे सांगितले. अवेज यांनी सदीरल जागेबाबत शहाबोद्दनी कडे चौकशी केली असता भाऊसाहेब गायकवाड आणि चंद्रभान गायकवाड यांचे प्लाट असल्याचे सांगितले.

23 डिसेंबर 2019 रोजी सालेह बिन खालेद याने फिर्यादीच्या दोघा भावांना जिल्हाधिकारी कार्यालयता नोटरीसाठी बालावले. तेथे फिर्यादीच्या भावांना वरील आरोपींनी बनावट कागदपत्राच्या आधारे बाळापुर येथील गट क्रं. 147 मधील प्लाटची विक्री 9 लाख रूपयांत करुन गंडा घातला. दरम्यान फिर्यादीचे दोघे भाऊ बाळापुर येथील प्लॉटवर गेले असता सदर प्लॉट हा गायकवाड यांचाच असून त्यांनी या प्लॉटची विक्री केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.