करडई तेल लिटरमागे २० रुपयांनी वाढले

सूर्यफुल तेल १४६ रुपये
करडई तेल लिटरमागे २० रुपयांनी वाढले

औरंगाबाद - aurangabad

दिवाळीनंतर सर्वत्र लग्नसराईची लगबग सुरू झाली आहे. २० नोव्हेंबरपासून सनई चौघडे वाजण्यास सुरुवात होत असतानाच खाद्यतेलाचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. सूर्यफुल, सरकी तेलाचे दर लिटरमागे अनुक्रमे चार व दोन रुपयांनी कमी झाले तर, त्याच वेळी करडई तेलाचे भाव लिटरमागे २० रुपयांनी वाढले आहेत.

इंधन, गॅस दरवाढीबरोबरच खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट गेल्या वर्षभरापासून कोलमडले आहे. खाद्यतेलाचे दर ऑगस्ट २०२० पर्यंत काहीसे स्थिर होते, परंतु त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ होत गेली आहे. खाद्यतेलाचा भडका उडाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला. करडईसह तीळ, मोहरी तेलाने लिटरमागे २०० रुपयांचा तर अन्य खाद्यतेलाचा दर आलेखही हा चढताच राहिला आहे. दरम्यान, ही दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने पाम, सोयाबीनसह सूर्यफुलाच्या कच्च्या तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे.

शेंगदाणा, पामतेल, तीळ व मोहरी तेलाचे दरही गेल्या दोन महिन्यापासून स्थिर आहेत, पण गेल्या महिन्याच्या तुलनेत करडई तेलाच्या दरात लिटरमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या २२० प्रती लिटर या दराने करडईची विक्री होत आहे. ग्राहकांसाठी काहीशी समाधानाची बाब म्हणजे सूर्यफुल व सरकी तेलाच्या दरात लिटरमागे अनुक्रमे ४ व २ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सूर्यफुल तेल १४६ रुपये तर, सरकी तेलाचे दर प्रती लिटरसाठी १३४ रुपये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

खाद्यतेलाचे दर (प्रती लिटरप्रमाणे)

करडई - २२०

शेंगदाणा - १६८

सोयाबीन - १३६

सूर्यफुल - १४६

सरकी - १३४

पाम - १३०

तीळ - २००

मोहरी - २००

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com