Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकंगनाच्या कबुलीतून भाजपचे षडयंत्र उघड

कंगनाच्या कबुलीतून भाजपचे षडयंत्र उघड

मुंबई | प्रतिनिधी

अभिनेत्री कंगना रौनटने आपल्या ट्वीटमधून तम आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुलीजबाब दिलेला आहे. तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भाजपनेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती.

- Advertisement -

भाजपने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केली.

सुशांत सिंग प्रकरणात कंगनाने घेतलेली भूमिका आणि बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांबद्दल तिच्याकडे खूप माहिती आहे असा तिने आणलेला आव हा भाजपच्या इशा-यावरच होता. अद्यापही तिने एनसीबीला कोणतीही माहिती दिलेली नाही.

तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली. मुंबई पोलिसांना माफिया म्हटले होते, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत असे कंगना म्हणाली होती. ती एवढ्यावरच थांबली नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. कंगना दररोज महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत असताना भाजप नेते खुश होत होते. काँग्रेस पक्ष भाजपच्या या कुटील कारस्थानाचा तीव्र निषेध करत असून राज्यातील जनता भाजपच्या या महाराष्ट्रद्रोहाला कदापी माफ करणार नाही, असेही सचिन सावंत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या