Friday, April 26, 2024
HomeUncategorized31 जानेवारी पर्यंत वाढवली 'मिशन बिगीन अगेन'ची नियमावली

31 जानेवारी पर्यंत वाढवली ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली

मुंबई – Mumbai

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानं आता देशातही शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्यातही या कोरोनाचा भीती व्यक्त केली जात असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या