गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत नियमावली

औरंगाबाद- (Aurangabad)

औरंगाबाद पोलिस विभागातर्फे गणपतीच्या स्थापनेपासून (establishment) ते विसर्जनापर्यंत (immersion) होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नियमावली खालीलप्रमाणे-

गणपतींची स्थापना (establishment) आणि विसर्जनाच्या (immersion) दिवशी मिरवणूक (Procession) काढण्यास बंदी.

पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन केले तर उत्तमच.

गणेशमूर्ती घरी आणण्याकरिता किंवा विसर्जन करण्यासाठी कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.

भजन, कीर्तन, आरती व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घेणे आवश्यक.

मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक महाप्रसाद वाटप, भंडारा यासारखे लोकसमुहांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाही. तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे असल्यास स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत/ नगरपरिषद यांच्याद्वारे उपलब्ध वाहनातच एकत्रित मूर्ती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विसर्जनासाठी घराबाहेर न पडता सदरच्या वाहनात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जमा करावी.

शक्य असल्यास वैज्ञानिक पद्धतीने घरच्या घरीच मूर्तींचे विसर्जन करण्यावर भर द्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करतानाच हा गणेशोत्सव आनंददायी व जल्लोषपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद ग्रामीम जिल्हा पोलिस दलातर्फे ऑनलाइन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

यामध्ये रांगोळी, निबंध, सेल्फी विथ ट्री, चित्रकला, एकपात्री नाटक, संदेशात्मक देखावे अशा श्रेणींमध्ये स्पर्धक ऑनलाइन स्पर्धेकरिता सहभाग नोंदवू शकतात.

गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा एक गाव एक गणपती या संकल्पनेतून ग्रामीण जिल्हा पोलिस दलातर्फे उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान कायदा व शांततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.