Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत फटाक्यांसाठीचे नियम

औरंगाबादेत फटाक्यांसाठीचे नियम

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरत असली तरी यंदाच्या दिवाळीत कोरोना नियमांची कोणीही पायमल्ली करू नये अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय फटाक्यांच्या बाबतीत देखील नियमावली जारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहेत नियम

नागरिकांनी विक्रेत्यांकडे सुधारित ग्रीन फटाक्यांचीच मागणी करावी

मोठी लड किंवा 500 च्या पुढे फटाके असलेली लड घेऊ नये.

ऑनलाइन फटाके मागवू नयेत.

बेरियम सॉल्ट केमिकल असलेल्या फटाक्यांवर बंदी आहे.

लिथियम अल्सेनिक असलेले फटाके घेऊ नयेत

125 डेसिबल आवाज करणारे फटाके वापरणे टाळावे.

नागरिकांना माहिती नसली तरीही प्रशासनाकडून याची तपासणी केली जाणार आहे.

मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळावे.

रात्री 8 ते 10 या कालावधीतच फटाके वाजवावेत.

आपल्या आजू-बाजूच्या लहान मुले, वृद्धांची काळजी घेऊन, ध्वनी व हवेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

शांतता झोनच्या 100 मीटर परिसरात फटाके वाजवू नयेत. शांतता झोन म्हणजे न्यायालय, हॉस्पिटल, नर्सिंग रुम इत्यादी.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचे पथक कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Commissioner Dr. Nikhil Gupta) यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या