Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'चार्जिंग स्टेशन'साठीची नियमावली जाहीर

‘चार्जिंग स्टेशन’साठीची नियमावली जाहीर

औरंगाबाद – aurangabad

महापालिकेने (Municipal Corporation) आता इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicle) वाढता वापर लक्षात घेऊन चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्यासाठीच्या नियमावलीचा ठराव मंजूर केला आहे. रहिवासी वापर, वाणिज्य आणि औद्योगिक वापराकरिता प्रत्येकी एक, दोन आणि तीन याप्रमाणे चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

महापालिकेच्या नगररचना विभागाने (Town Planning Department) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्रमांक ४.४.२ (आय) नुसार चार्जिंग स्टेशन उभारण्याचा ठराव मंजूर केला आहे. (State Government) राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून तसेच रेस टू झीरो या मोहिमेत शहराचा सहभाग असल्याने भविष्यात शहरात इलेक्ट्रिक वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची आवश्यकता वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन इमारतीमध्ये चार्जिंग पॉइंटची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये रहिवासी वापर असलेल्या २५ ते ५० सदनिकांसाठी एक चार्जिंग पॉइंट, ५० पेक्षा जास्त प्रत्येकी २५ सदनिकांसाठी एक, पूर्ण वाणिज्य वापर-बांधकाम क्षेत्र ३०० ते ५०० चौरस मीटरसाठी एक, वाणिज्य बांधकाम क्षेत्र ५०० चौ.मी. वरील प्रत्येक २५० चौरस मीटर क्षेत्रासाठी दोन, औद्योगिक वापर प्रत्येक ५०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्रासाठी तीन याप्रमाणे चार्जिंग स्टेशनची तरतूद करण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या