शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक-जिल्हाधिकारी

शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक-जिल्हाधिकारी

औरंगाबाद - aurangabad

(Vaccination) लसीकरण हे सुरक्षा कवच आहे. लसीकरण वाढविण्यासाठी सर्व शासकीय आणि खाजगी (Hospital) रुग्णालयांमध्ये लसीकरणाच्या तिन्ही डोसबाबत रुग्णांना विचारणा करण्याचे निर्देश (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कोणत्याही (Surgery) शस्त्रक्रियेपूर्वी ज्याप्रमाणे HIV सह काही तपासण्या बंधनकारक आहेत त्याप्रमाणे RT-PCR चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय देखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला.

शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक-जिल्हाधिकारी
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ; पाऊस पाणी मुबलक, राजा कायम राहणार, रोगराईचे प्रमाण नियंत्रणात!
शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक-जिल्हाधिकारी
आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा : सुप्रीम कोर्टाचे आदेश

लसीकरण झालेले आहे का नाही याबाबत केस पेपरवर नोंद घेतली जाणार आहे. या केसपेपरची तपासणी यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाचे संदेश चित्रपट गृह, नाट्यगृह मधून प्रसारित करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासनाचे शहरी भागातील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एकूण दहा आरोग्य केंद प्रमुखांना लसीकरण कमी झाल्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस देण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे,उपजिल्हाधिकारी संगीता संगीता चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोतीपवळे, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, महापालिकेच्या डॉ. संकलेजा यांच्यासह सर्व आरोग्य आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.