Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedरोजगार सेवकांना मिळणार 'टॅब' ; 70 कोटींचा खर्च

रोजगार सेवकांना मिळणार ‘टॅब’ ; 70 कोटींचा खर्च

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

राज्यातील सुमारे २७ हजार रोजगार सेवकांना ७० कोटी रुपये खर्चून येत्या दीड वर्षात टॅब दिले जाणार आहेत. रोजगार हमी योजनेतील कामे आणि डेटा ऑनलाईन (online) पद्धतीने व्हावा यासाठी रोजगार हमी विभागाने पुढाकार घेतला आहे. 

- Advertisement -

रोजगार सेवकांना वरिष्ठांकडे सादरीकरण किंवा मंत्रीस्तरावर डेटा पोहोचवण्यासाठी या कागदपत्रांचे वर्गीकरण करावे लागते. तक्ते तयार करावे लागतात. आकडेमोडही असतेच. भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि रोहयोचे अत्यंत जवळचे नाते असल्याने कामांचे वारंवार फोटो काढावे लागतात. मजुरांचेही फोटो काढून ते अपडेट करावे लागतात. ही सारी कामे मोबाईलवर करणे किचकट, जिकिरीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यात वस्तुस्थिती असल्याचे लक्षात आल्यावर सरकार जागृत झाले आहे.

चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार जेरबंद

आजकाल कागदपत्रे सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. रोजगार हमी योजनेतील रोजगार सेवकांना रस्ते, विहिरी आणि इतर कामांची बिले सांभाळावी लागतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी पुढाकार घेतला आहे. रोहयो खाते अपडेट करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असून सर्व कामे ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी टॅब दिले जाणार आहेत.

ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी साधे कपाटही नव्हते, खुर्चीही नव्हती. आता त्यांना कपाटासोबत टेबल, खुर्चीही देण्यात येणार असल्याची माहिती रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. ते म्हणाले, आता हे सेवक त्यांची मौल्यवान कागदपत्रे कपाटात सुरक्षितपणे ठेवू शकतील. बसण्यासाठी खुर्ची आणि स्वतंत्र टेबल मिळाल्याने त्यांच्यात सन्मानाची भावना निर्माण होईल. काळाची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला टॅब मिळेल. त्यावर ते ऑनलाइन काम करू शकतील. यामुळे ग्रामीण भागात शासकीय कामकाजाची गती काही प्रमाणात वाढेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या