औरंगाबादेतील पगारिया शोरूमवर दरोडा

jalgaon-digital
3 Min Read

औरंगाबाद – aurangabad

अदालत रोडवरील (Pagariya Auto) पगारिया ऑटोच्या शोरूमवर बुधवारी मध्यरात्री धाडसी दरोडा पडला. शोर्ममधून दोन तिजोर्‍या उचलून नेत गोलवाडी शिवारात फोडल्या. तिजोरीतून १५ लाख ४३ हजार २४७ रुपये ल॑पास केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात (police) गुन्हा नोदविला आहे.

पाच चोरांच्या टोळीने शोरुमचे शटर उचकटून काचा फोडल्या आणि शोरुममधील रोकड असलेल्या दोन तिजोऱ्या लंपास केल्या. विशेष म्हणजे, अवघ्या २० ते २५ मिनिटांत चोरट्यांनी १५ लाख ४३ हजार २४७ रुपयांची रोकड असलेल्या तिजोऱ्या चोरल्या आणि गोलवाडी शिवारात फोडून पैसे घेवून पसार झाले. गुरुवारी (४ ऑगस्ट) रात्रीत एक ते दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली.

कांचनवाडीत राहणारे अभिषेक अमिताब रॉय (४१) हे शोरूमचे ऍडमिन आहेत. बुधवारी ३ रात्री पावणेदहा वाजता सुरक्षा रक्षकांनी शोरूम बंद केले. त्यानंतर सर्व चाव्या व्यवस्थापक कमलेश मुनोत यांच्याकडे दिल्या. ते सर्वजण घरी गेले. राजेंद्र सोनवणे आणि रावजण्णा गारेह्लू हे दोघे रात्रपाळीचे सुरक्षा रक्षक म्हणून तेथे ड्यूटीला थांबले.

दरम्यान, रात्री ११ बाजेनंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते दोघे चारचाकी विक्रीच्या बाजूने एक समोर आणि दुसरा पाठीमागे जाऊन बसले. ज्या बाजूने सुरक्षारक्षक नाही त्या बाजुने पहाटे एक बाजूने दहा मिनिटांनी पाच चोरटे आले. त्यांनी दुचाकी विक्रीच्या बाजूने शटर उचकटले. चार चोरटे शोरूममध्ये घुसले. इकडे-तिकडे काहीही न उचकता ते थेट तिजोरी असलेल्या कॅश काऊंटरकडे गेले.

तेथे काही मिनिटे त्यांनी काच खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच खोलत नसल्यामुळे त्यांनी टॉमीने काच फोडली. त्यानंतर दोन्ही तिजोर्‍्या तेथून उचलल्या. समोरच असलेल्या पेन्ट्री रुमच्या खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी तिजोऱ्या बाहेर काढल्या. तेथून त्या बाजुलाच असलेल्या मोकळ्या मैदानात फेकल्या. काही मिनिटे तेथे तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाज होऊ लागल्यामुळे त्यांनी दोन विना क्रमांकाच्या दुचाकीवर दोन्ही तिजोऱ्या वाळूज रोडवरील गोलबाडी शिवारात छावणी उड्डाणपुलाच्या बाजूला नेल्या. तेथे मोठ-मोठे दगड घालून तिजोर्‍या फोडल्या आणि त्यातील १५ लाख ४३ हजार २४७ रुपये काढून घेतले व रिकाम्या तिजोर्‍या त्याच ठिकाणी टाकून चोरटे पसार झाले.

सकाळी या ठिकाणी रिकाम्या तिजोऱ्या आढळल्यावर पोलिसांनी तिकडे धाव घेतली होती. गुरूवारी सकाळी साडेसहा वाजता सुरक्षा रक्षकांना जाग आली. त्यांनी शोरूमला चोहोबाजूंनी चक्कर मारली. तेव्हा दुचाकी विक्रीच्या बाजूचे शटर उचकटलेले दिसले. हा प्रकार त्यांनी तत्काळ ऍडमिनअभिषेक रॉय यांना फोनवरून कळविला. रॉय हे तत्काळ शोरूमला आले. त्यांनी लगेचच क्रांती चौक पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक विकास खटके यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनीही घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *