उन्हासोबत महागाईचेही 'चटके'

हॉटेलिंग महागले
उन्हासोबत महागाईचेही 'चटके'

औरंगाबाद - aurangabad

पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) दरासह व्यावसायिक (lpg) एलपीजीच्या दरात झालेली वाढ आणि खाद्यतेलांच्या (Edible oil) किमतीतील भडका या सर्व दरवाढींचा फटका आता राज्यातील खवय्यांना बसणार आहे. कारण (Restaurant and hotel) राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांकडून वाढलेला दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी लवकरच पदार्थांच्या किमतीत जवळपास 30 ते 35 टक्के वाढ करण्यात येणार आहे.

उन्हासोबत महागाईचेही 'चटके'
गर्भपाताचे साहित्य विकणाऱ्या 'मिशो'वर गुन्हा

व्यावसायिक (corona) कोरोना संकट काळात दोन वर्षे हॉटेल व्यवसाय एलपीजीच्या दरात झालेली वाढ आणि ठप्प होता. त्यानंतर आता इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलांच्या किंमतीतील भडका या सर्व दरवाढीचा फटका आता खवय्यांना बसणार आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांकडून वाढलेला दैनंदिन खर्च भरून काढण्यासाठी लवकरच पदार्थांच्या किंमतीत सुमारे 30 ते 35 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात येणार आहे.

गॅस, भाजीपाला, खाद्यतेल महागल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे शिवाजी पाटील यांनी सांगितले. इंधनाच्या किंमती वाढत असल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने हॉटेलमधील खाद्य पदार्थांचे दर बाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. व्यावसायिक वापरातील 19 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलिंडर दरात गेल्या वर्षभरात 1100 रुपयांहून अधिकची वाढ होऊन ते 2200 रुपयांपर्यंत गेले आहे. नुकसान भरून काढताना व्यवसायात तग धरून राहण्यासाठी पदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किंमतीत भडका उडाल्याने मेनू कार्डमधील दरवाढीस फोडणीच मिळाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमधील 70 टक्के पदार्थ हे रिफाईंड ऑईलमध्ये तयार केले जातात. त्यामुळे तळलेल्या आणि तेलाचा वापर होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत वाढ होणार आहे. जेवण तयार करण्याचा खर्च प्रचंड वाढल्याने मेनू कार्डमधील पदार्थांच्या किंमतीही वाढणार आहे.

Related Stories

No stories found.