Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमधील रिक्षा चालकांना लागणार शिस्त!

औरंगाबादमधील रिक्षा चालकांना लागणार शिस्त!

औरंगाबाद Aurangabad

शहरातील रिक्षा चालकांच्या (rickshaw pullers) बेशिस्तीबद्दल (indiscipline) विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) दखल घेत रिक्षाचालकांना शिस्त (discipline) लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Officer )कार्यालयाने तातडीने रिक्षा संघटनांची (rickshaw associations) बैठक घेत रिक्षाचालकांनी नियम आणि शिस्त पाळण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरटीओ कार्यालयाने आता पोलिसांच्या (police) मदतीने बेशिस्त रिक्षा चालकांवरील कारवाई (action) अधिक तीव्र केली आहे.

- Advertisement -

शहरातील रिक्षा चालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी शहरात रिक्षा चालकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक प्राधिकरण समितीने रिक्षा चालकांना नुकतीच भाडेवाढ दिलेली आहे. नवीन भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांनी मीटरचे अद्ययावतीकरण (कॅलिब्रेशन) करून घेणे अपेक्षित आहे. मात्र याबद्दल  रिक्षा चालकांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र केली आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आरटीओ कार्यालयात आढावा बैठक घेतली. आरटीओच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लावा, त्यासाठी आवश्यक ती पोलिसांचीही मदत घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दुपारी रिक्षा संघटनांची तातडीची बैठक घेत विभागीय आयुक्तांच्या सूचनांची माहिती दिली व कारवाई अधिक तीव्र केल्याचे स्पष्ट केले. यावेळी ३० नोव्हेंबरपर्यंत मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्यात यावे, अशा सूचना दिल्या. तर रिक्षा युनियनच्या पदाधिकार्‍यांनी तारीख वाढवून देण्याची मागणी केली ती अमान्य करण्यात आली. उलट सुटीच्या दिवशीही फिटनेस करून देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने दर्शली आहे.

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनीही तातडीने पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर आता आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू झाली आहे. शहरात पोलिस आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त कारवाईत २१ रिक्षा जप्त करत आरटीओ कार्यालयात लावण्यात आल्या.

तर वाळूज भागात ४० रिक्षा जप्त करून वाळूज पोलिस ठाण्यात लावल्या आहेत. याशिवाय सिडको वाहतूक शाखेनेही सिडको चौकात रिक्षा विरोधात मोहीम राबवली. आरटीओ आणि पोलिस यांनी संयुक्त मोहीम सुरू केल्यानंतर वाळूज भागात दुपारनंतर रस्त्यावरील रिक्षा गायब झाल्या.

रिक्षाचालकांनी फोनाफोनी करून सहकाऱ्यांना मोहिमेची माहिती दिल्यामुळे वाळूजच्या सर्वच परिसरातील रिक्षा रस्त्यावरून गायब झाल्या होत्या. 

- Advertisment -

ताज्या बातम्या