अर्थ राज्यमंत्र्यांनी घेतला ‘रन फॉर युनिटी’चा आढावा

अर्थ राज्यमंत्र्यांनी घेतला ‘रन फॉर युनिटी’चा आढावा

औरंगाबाद- Aurangabad

मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 18 सप्टेंबरला शहरात रन फॉर युनिटीचे ('Run for Unity') आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पूर्वतयारी बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad)यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रन फॉर युनिटी ('Run for Unity') संदर्भात आढावा बैठकीस पोलिस आयुक्त निखील गुप्ता (Commissioner Nikhil Gupta), जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, राज्य अथलेटिक संघटनेचे पंकज भारसाखळे, बापू घडमोडे उपस्थित होते.

रन फॉर युनिटीमध्ये सहभागींना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना डॉ.कराड यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. टीएफआय आणि ग्रीन ग्लोब फाऊंडेशन आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पुढाकाराने शहरात रन फॉर युनिटीचे ('Run for Unity') आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. सर्वांसाठी खुल्या असलेल्या दौड संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना पोलिस प्रशासनाकडून करण्यात येतील, असे गुप्ता म्हणाले. टीएफआयच्या दीपक कोलते यांनी सादरीकरण केले. गटणे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com