Monday, April 29, 2024
HomeUncategorizedजी-20 शिखर परिषदेचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

जी-20 शिखर परिषदेचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

औरंगाबाद – aurangabad

जी-20 राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (G-20 Summit) निमित्ताने शिखर परिषदेच्या प्रतिनिधींचे 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे आगमन होईल. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ लेणी (Verul Caves) आणि इतर स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांनी आढावा घेतला.

- Advertisement -

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, उपायुक्त जगदिश मिनियार आदी उपस्थित होते.

जी-20 परिषदेचे प्रतिनिधींचे औरंगाबाद शहरात 26 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी आगमन होणार आहे. वेरुळ तसेच महत्वाची पर्यटन स्थळे तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीची पाहणी करणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच पर्यटन स्थळांवरील सोईसुविधा, रस्ते दुरूस्ती, आरोग्य सुविधा यासह विविध सोईसुविधांचा आढावा घेतला.

जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच आलेल्या पाहुण्यांची निवास, प्रवास, आरोग्य यासह सर्व सोईसुविधा देण्याबाबत काटेकोर नियोजन करा, येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व नियोजनपूर्वक काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या