लसीकरणाची गती वाढवण्यासाठी बंधने शिथिल 

स्तनदा मातांनाही मिळणार लस
लसीकरणाची गती वाढवण्यासाठी बंधने शिथिल 

औरंगाबाद - Aurangabad

आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आता एकएक बंधने उठवली जात आहेत. यापूर्वी स्तनदा मातांना कोरोना लस घेण्यास परवानगी नव्हती. आता मात्र त्यांना लस घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

गर्भवती व स्तनदा मातांना कोरोना लस घेण्यास शासनाकडून आजवर परवानगी देण्यात आलेली नव्हती. विशेषतः शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके असलेल्या स्तनदा मातांना कोरोना लस घेण्यास परवानगी दिलेली नव्हती. मात्र आता स्तनदा माता लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य विभागाने आता नवीन मार्गदर्शक सुचनामध्ये स्तनदा मातांना लस घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्तनदा मातांना लस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा पहिला डोस घ्यावा, असे आवाहन डॉ.पाडळकर यांनी केले.

आरोग्य विभागाच्या नवीन मार्गदर्शक सुचनानुसार आता कोरोना झालेल्या व्यक्तींना तीन महिने लस घेता येणार नाही. तीन महिन्यानंतर लसीचा पहिला डोस घेता येईल. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यानंतरही तीन महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. तीन महिन्यांचे अंतर पहिल्या आणि दुसर्‍या डोसमध्ये ठेवण्यात आल्याचेही डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com