Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'थर्टी फस्ट'च्या उत्साहावर निर्बंधांचे बंधन!

‘थर्टी फस्ट’च्या उत्साहावर निर्बंधांचे बंधन!

औरंगाबाद – aurangabad

ओमायक्रॉनच्या (Omycron) धास्तीने जिल्हा प्रशासनाने (District Administration) नव्याने निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार (Hotel) हॉटेल, जिम, सिनेमा, लग्न समारंभात ५० टक्के लोकांनाच परवानगी असेल. विवाह सोहळा बंदिस्त जागेत असेल तर १०० पेक्षा जास्त लोक नसावेत. मोकळ्या जागेत २५० जणांना परवानगी असेल. या निर्बंधाचे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

चार दिवसांनंतर नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला जाईल. तसेच लग्न, इतर कार्यक्रमांत होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डिसेंबर राेजी रात्री उशिरा मनपा प्रशासक व पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने नवीन निर्बंध जारी केले. त्यानुसार सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमात हॉलमध्ये १०० तर मोकळ्या जागेत २५० लोकांना परवानगी राहील. क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी आसन क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षक, रेस्टॉरंट्स, जिम्नॅशियम, स्पा, सिनेमा हॉल आणि थिएटर्समध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोक, विविध आस्थापनांमध्ये ५०% लोकांनाच परवानगी असेल. जिल्हाभरात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाआहे.

३१ डिसेंबरचे कार्यक्रम रद्द

गेल्या दोन वर्षांपासून लोकांना थर्टी फस्ट साजरा करता आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी नववर्ष साजरे करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या नवीन निर्बंधांमुळे नाराजी आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, आम्ही ३१ डिसेंबरचे नियोजित सर्व कार्यक्रम यापूर्वीच रद्द केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या