Friday, April 26, 2024
HomeUncategorizedओमायक्रॉनच्या धर्तीवर थर्टी फस्टवर बंधने 

ओमायक्रॉनच्या धर्तीवर थर्टी फस्टवर बंधने 

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाच्या (corona) वाढत्या रुग्णसंख्येमुळे (State Government) राज्य सरकारने (Thirty first) थर्टी फस्टवरच्या सेलिब्रेशन (Celebration) करणाऱ्यांसाठी निर्बंध घातले आहेत. शहरात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन व पोलिसांनी कंबर कसली आहे. (Hotels, restaurants) हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के उपस्थितीच्या नियमाचे पालन होते की नाही याची पाहणी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे पथक करणार आहे. तसेच रात्री दहानंतर गाण्यावर धिंगाणा, डीजेवर, फटाके उडवण्यावर बंदी राहील. तसेच मध्यरात्री रस्त्यावर उतरून धिंगाणा, मस्ती करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या निर्बंधांमुळे ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करणाऱ्यांच्या नियोजनावर मात्र पाणी फिरणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षीही अनेकांना नववर्षाचे स्वागत जल्लोषात करता आले नाही. यंदाही ओमायक्रॉनचा धोका असल्यामुळे राज्य सरकारने २४ डिसेंबर रोजी काही निर्बंध घातले आहेत. त्यात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू असेल. याच नियमांचे ३१ डिसेंबर राेजी रात्रीही पालन केले जाणार आहे. एकीकडे नववर्षाच्या स्वागताची रेस्टॉरंट, बारचालकांनी जय्यत तयारी सुरू केलेली असताना या आदेशामुळे मात्र ५० टक्के ग्राहकांच्या मर्यादेतच त्यांना व्यवसाय करावा लागेल.

शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपासून शनिवारी पहाटेपर्यंत ९०० पोलिस कर्मचारी शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असतील. तीन उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्तांसह २१ पोलिस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचा कडेकोट बंदोबस्त राहून ३९ ठिकाणी नाकेबंदी राहील.

वेळेबाबत निर्बंध नाही

परवानगीधारक रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेवर कार्यरत राहतील. इतर सार्वजनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी पहाटेपर्यंत बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची अनुमती दिली जाते. यंदा मात्र तशी मुभा देण्यात आलेली नाही किंवा ठरावीक वेळेत बंद करण्यासंदर्भात देखील कुठलेही आदेश नाहीत. त्यामुळे ५० टक्के आसन क्षमतेचे आदेश वगळता बंद करण्याची वेळदेखील नेहमीप्रमाणेच राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट झाले.

अनेक ठिकाणी सार्वजनिक पार्टीचे आयोजन केले जाते. त्यात मोठ्या आवाजात गाणे, नाचण्याचे प्रकार घडतात त्याला मात्र परवानगी नसेल. स्वतंत्र पार्टी, इव्हेंट्सच्या व्यावसायिक नियोजनावर पूर्णत: बंदी असेल. रात्री दहा वाजेनंतर डीजे, रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पोलिसांची पथके नियुक्त केली आहेत. कोरोना निर्बंध पाळले जात आहे की नाहीत याची चाचपणी करण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादनाची पथके नजर ठेवून राहतील.

दहा पथके

राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट दारू, अवैधरीत्या दारू विक्रीवर कारवाईसाठी दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. वाइन शॉप नेहमीप्रमाणे वेळेत बंद होतील, तर बारमध्ये शासनाच्या निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी पथके पाहणी करणार आहेत. बारचालकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. नाहक गर्दी करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या