गर्दी वाढल्यास दारूच्या दुकानांवर सुद्धा निर्बंध

आरोग्यमंत्र्यांचा इशारा
गर्दी वाढल्यास दारूच्या दुकानांवर सुद्धा निर्बंध

औरंगाबाद - aurangabad

राज्यात कोरोना (corona) व ओमायक्रॉनच्या (Omycron) वाढत्या धोक्यामुळे आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात आता गर्दी होत राहिल्यास दारूची दुकानही बंद करावी लागणार, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आले. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात ऑक्सीजनची मागणी थोडी वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही, असेही त्यांनी सांगितले.

काल जारी केलेल्या निर्बंधानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करताना दिसत आहेत. यामुळे गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील, त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com