Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत खासगी रुग्णालयांतील लसीकरणाला प्रतिसाद

औरंगाबादेत खासगी रुग्णालयांतील लसीकरणाला प्रतिसाद

औरंगाबाद – Aurangabad

कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीचे दर राज्य सरकारने ठरवून दिलेले आहेत. आजवर 70 हजार नागरिकांनी खासगी रुग्णालयांतून लस घेतली आहे. कोविशिल्ड (Covishield) 780 रूपये, (Covaxin) कोव्हॅक्सीनचे 1410 रुपये आणि रशियाची (Sputnik V) स्पुतनिक व्ही 1145 रुपये याप्रमाणे लसीचे दर आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, केवळ एका डोससाठी एवढे शुल्क आकारले जात आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने (State Government) लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळावा, म्हणून मोफत लसीकरणासोबतच रोखीने लस घेण्यास परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयासाठी कंपनीला लस विक्रीची परवानगी दिलेली आहे. त्याकरिता लसीची किंमत ठरवून देण्यात आलेली आहे. त्यानुसार कोविशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सीन 1410 रुपये आणि स्पुतनिक व्ही 1145 रुपये याप्रमाणे दर आकारून लसीचा एक डोस देऊ शकतील. शहरात महापालिकेने लसीकरणासाठी जंम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याकरिता 115 वॉर्डात केंद्र सुरू केले आहे.

पालिकेकडून शहरात मोफत लसीकरण केले जात असले तरी शहरातील 9 खासगी रुग्णालयात मात्र रोखीने लस दिली जात आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसोबत खासगी रुग्णालयांनी करार करुन कंपन्यातील कामगारांसह त्यांच्या कुटुंबियाचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी थेट कामगारांकडून लसीच्या डोसचे पैसे न घेता कंपनीकडून एकत्रितपणे लसीकरणाची रक्कम घेतली जात आहे.

शहरातील खासगी रुग्णालयांपैकी एमआयटी हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल, बजाज हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, कृपामयी हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, मेडिकव्हर हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल यांचा समावेश आहे. आजवर खासगी रुग्णालयांनी 70 हजार नागरिकांचे लसीकरण केले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या