‘गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – aurangabad

आई (mother) ही आईच असते ती श्रीमंत असो किंवा गरीब… आई ती आईच असते…आणि प्रत्येक आईला असेच वाटते की माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावं आणि माझा नऊ महिन्यांचा गरोदरपणा आनंददायी व्हावा. यासाठी प्रत्येक मातेने गरोदरपणात योगा आणि प्राणायाम करण्याचे आवाहन डॉ.चारुलता रोजेकर- देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांचे मार्गदर्शन असणारा आणि लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव अशा ‘गर्भसंस्कार- एक नवीन पाऊल’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या युट्युब आणि फेसबुक पेजवरुन थेट प्रसारण करण्यात आले. या उपक्रमाच्या पहिल्या भागाला दर्शकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ‘गर्भवती महिलांमधील शारीरिक व मानसिक समस्या’ या विषयावर डॉ. रोजेकर यांच्या पहिल्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *