Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedदेशाच्या अमृत महोत्सवी वर्षांतही महिलांचे प्रश्न कायम

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांतही महिलांचे प्रश्न कायम

औरंगाबाद – aurangabad

देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सगळे प्रश्न संपले असे नाही तर प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे. आपण स्वकेंद्रित झालो आहोत. केवळ आपले कुटुंबच आपली जबाबदारी नसून समाजाप्रती आपण आपले कर्तव्य विसरत आहोत. लढे आजही द्यावे लागत आहेत. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) साजरा करत असताना आजही महिलांचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाही. महिलांवर अत्याचार, अन्याय होतच आहे. आता महिलांच्या मंडळांनी समाजात अधिक सक्रिय होऊन काम करण्याची गरज आहे. नुसत्या बैठका नको तर कृती हवी, असे मत (Marathwada) मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वांतत्र्यसेनानी ताराबाई लढ्ढा यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

वयाची ९४ वर्षे पूर्ण केल्याबद्दल ताराबाई लढ्ढा यांचा ‘सजग’च्या बैठकीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यातील आठवणींना उजाळा दिला. लढे म्हणजे ध्येयपूर्तीच्या दिशेने केलेली वाटचाल असते. आज दुर्दैवाने असे लढे पाहायला मिळत नाही. पण जर महिलांच्या हक्कांसाठी कोणताही लढा असेल तर मी त्यात सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी डॉ.रश्मी बोरीकर यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. आगामी काळात सजगने कोणत्या विषयावर काम करावे याबाबत सदस्यांनी सूचना केल्या.

मीना खंडागळे यांनी आर्थिकदृष्ट्या मागास भागातील तरुण-तरुणींसाठी काम करण्याची गरज विषद केली. तर ललिता गादगे, सुलभा खंदारे यांनी शिक्षणांच्या प्रवाहात उपेक्षित वर्ग टिकून राहावा यासाठी प्रयत्न करण्याचे मत मांडले. मंगल खिवंसरा यांनी आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत जागृत राहून (police) पोलिस प्रशासनाचे कार्य कसे चालले आहे याचा आढवा घ्यावा जेणेकरून महिला व पीडितांना येणाऱ्या अडचणी समजून त्यांना मदत कशी करता येईल यांचे आकलन होईल, असे सांगितले.

प्राचार्या मनोरमा शर्मा यांनी ज्येष्ठ व्यक्तींकरीता संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन कसे करता येईल यावर प्रकाश टाकला. डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी तरुणांमध्ये वाढत्या समाजमाध्यमांचा वेध घेत हे व्यसन सायबर गुन्हेगारीकडे कसे वळते यांची जागरूकता करण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरस्वती जाधव, शकीला पठाण यांनीही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पीडितेला मदत मिळवताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. सुनिता जाधव यांनी हेल्प लाइनवर भाष्य केले. डॉ. बोरीकर यांनी बाईला बाई म्हणून समजून घेणे अधिक गरजेचे असल्याचे सांगितले. या बैठकीस सुहासिनी बोरीकर, डॉ. अनू मधाळे, शालिनी बुंदे यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या