Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized'ओबीसीला धक्का न लावता सर्व समाजाला आरक्षण द्यावे’

‘ओबीसीला धक्का न लावता सर्व समाजाला आरक्षण द्यावे’

औरंगाबाद – Aurangabad

आरक्षण हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, तो मिळालाच पाहिजे. सर्व समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमचा पाठिंबा कायम आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी व्यक्त केली. मराठवाड्यात (Marathwada) पश्चिम वाहिनी नद्यांचे १३५ टीएमसी पाणी द्यावे, रोहिणी आयोग (Rohini Commission) अमंलात आणावा, मराठा, धनगर आदी समाजाला आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली.

- Advertisement -

अखिल भारतीय तैलिक महासभा नवी दिल्ली अंतर्गत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा आयोजित मराठवाडा विभागतील निमंत्रित पदाधिकारी यांची विभागीय बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी समाजाने एकत्र येऊन विकास करावा, असे आवाहन केले आहे. कुठल्याही राजकीय पक्षात काम करत असताना त्याचा परिणाम समाजाच्या हितावर परिणाम होता कामा नये, अशी विनंती त्यांनी केली. तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महिलांनी चूल व मूल या संकल्पेतुन आता बाहेर आले पाहिजे, असे सांगितले. मनुष्याच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्य करण्याचे आवाहन सव्वालाखे यांनी केले. महिलांनी कुटुंबाची काळजी घेऊन सामाजिक हित जोपासले पाहिजे, अशी विनंती त्यांनी महिलांना केली.

औरंगाबाद येथे पदाधिकारी नियुक्ती व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तेली समाजाच्या ज्वलंत राजकीय, सामाजिक, इतर अनेक प्रश्नावर चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आले. या विभागीय बैठकीसाठी माजी मंत्री, अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, विजय चौधरी (अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिंक तेली समाज महासभा), महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार शिवाजीराव चौथे, विक्रम चांदवडकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी कचरू वेळंजकर, मनोज संतान्से, सुरेश कर्डीले, दिपक राऊत, साई शेलार आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या