रिलायन्स जिओच्या टॉवरचे सील काढा ; मनपाला आदेश

रिलायन्स जिओच्या टॉवरचे सील काढा ; मनपाला आदेश

औरंगाबाद - aurangabad

(Reliance Jio) रिलायन्स जिओच्या २५ (Tower) टॉवरचे सील काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. एस. जी. दिघे यांनी दिले आहेत.

चालू थकीत रकमेचा भरणाही संबंधित (Mobile company) मोबाइल कंपनीतर्फे केला आहे. महापालिकेला योग्य फोरममार्फत यासाबंधी दाद मागता येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. मनपाने साडेतीन कोटींच्या वसुलीसाठी संबंधित टॉवर सील केले होते. महापालिकेने नोटीस बजावली तेव्हा संबंधित कंपनी दुसऱ्या कंपनीस विक्री केली होती. यासंबंधी लवादामध्ये सुनावणी सुरू असल्याने महापालिकेस अशा प्रकारे सील करण्याचा अधिकार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. तसेच चालू थकीत रक्कम कंपनीने भरल्याचे निदर्शनास आणून दिले. कंपनीच्या वतीने अॅड. रामेश्वर तोतला, अॅड. राहुल तोतला यांनी काम पाहिले तर मनपातर्फे अॅड. संभाजी टोपे यांनी बाजू मांडली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com