Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसंत गजानन महाराजांच्या पालखीची आठवण

संत गजानन महाराजांच्या पालखीची आठवण

दिपक सुरोसे

शेगाव – Shegaon

- Advertisement -

नागपंचमीच्या निमित्ताने आज खामगावसह बुलडाणा जिल्हावासियांना गजानन महाराजांच्या पालखीची आठवण झाली. दरवर्षी आजच्या दिवशी शहरात पालखीचे आगमन होत असते. मात्र यावर्षी करोनाच्या संकटामुळे पालखी सोहळा आठवणीतच राहीला.

‘गजानना अवलीया, अवतरले जग ताराया’ असा गजर करत संत श्री गजानन महाराजांची पालखी नागपंचमी म्हणजे आजच्याच दिवशी खामगाव नगरीत दाखल होत असते. सकाळपासूनच शहरात भक्तीभावाचे वातावरण असते.

श्रींच्या पालखीची राजवैभवी थाटात शहरातून मिरवणूक निघते. हजारो भाविक पालखीचे मनोभावे दर्शन घेतात. हा अनुपम्य सोहळा खामगावकरांसाठी एक उत्सव असतो. एक रात्र खामगाव येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रींची पालखी शेगावसाठी रवाना होते.

पालखीसोबत खामगावसह विदर्भातील संपुर्ण जवळपास एक लाख भाविक पायी जातात. मात्र यावर्षी कोरोनाने हे आनंदाचे क्षण हिरावून घेतले आहेत.

कोरोनामुळे गजानन महाराजांची पालखी पंढरपुर जावू शकली नाही. मात्र आज नागपंचमीनिमित्त खामगावसह जिल्हा वासियाना गजानन महाराजांच्या पालखीची आठवण झाली, अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत लवकर ‘कोरोनाचे संकट दुर होवो’, अशी मनोमन प्रार्थना श्री संत गजानन महाराजांकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या