अमरावतीसारखी घटना पुन्हा झाल्यास याद राखा-राज ठाकरे

अमरावतीसारखी घटना पुन्हा झाल्यास याद राखा-राज ठाकरे

औरंगाबाद - aurangabad

त्रिपुऱ्यात काही घडते आणि त्याचे (Maharashtra) महाराष्ट्रात पडसाद पडतात. (Amravati) अमरावतीसह काही शहरात दंगल उसळते. महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक संकट आणि बेरोजगारीख्या गंभीर प्रश्नांकडून लक्ष भरकटविण्यासाठीच या दंगली घडवल्या जातात. मात्र, अमरावतीत जे झाले तशी घटना (Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्रातील अन्य शहरात घडविण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मेळाव्याच्या माध्यमातून मळगळ आलेल्या मनसेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मनसेच्या मराठवाडा (Marathwada) विभागीतील १२०० हून अधिक पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मार्गदर्शन मेळावा हडकोतील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यातील १९ जिल्हाध्यक्षांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फक्त १५ मिनीटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

निवडणूकीसाठी सज्ज व्हा

राज ठाकरे म्हणाले, जनतेला सांगण्यासारखे किंवा दाखविण्यासारखे काही नसल्यास नको त्या मुद्यावर डोके भडकविण्याचे काम केले जाते. राज्यात सद्या तेच सुरू आहे. भ्रष्टाचार, घोटाळे यातून विकास गायब झालाय. कोणीच रस्ते, वीज, पाणी, महागाई याबाबत बोलत नाहीय. अशा परिस्थितीत मनसे महाराष्ट्रासाठी सक्षम पर्याय ठरणार आहे. कोणत्याही क्षणी निवडणूका लागल्या तरी त्यासाठी आतापासून सज्ज रहा. कामाला लागा. आपल्याला जिल्हा परिषद, महानगरपालिका पूर्ण क्षमतेने लढायच्या आहेत. तयारीचा भाग म्हणून प्रत्येक मनसैनिकांनी आपल्या घरावर मनसेचा झेंडा लावा, असे आदेश त्यांनी दिले.

...तर मनसे स्टाईल उत्तर

अमरावतीमध्ये उसळलेल्या दंगलीचा संदर्भ देतांना ठाकरे म्हणाले, इशान्यातील घटनेवर येथे दंगल घडविली जाते. त्यामागे राजकरण आणि राजकीय स्वार्थ आहे. मात्र, असे प्रकार राज्यात खपवून घेले जाणार नाही. जे अमरावतीत घडले ते अन्य शहरात घडल्यास मनसे त्यास जशास तसे उत्तर देईल.

Related Stories

No stories found.