Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार 

औरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार 

औरंगाबाद – Aurangabad

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. अशा वेळी राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसते. औरंगाबादमध्येही रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार औरंगाबादेतही सुरू असल्याचे शुक्रवारी समोर आले. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या दोन मेडिकल चालकांसह घाटी रुग्णालयातील एका चतुर्थ कर्मचार्‍याच्या पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी मुसक्या आवळल्या. तिघे आरोपी रेमडेसिवीरचा अवैध आणि वाढीव दराने विक्री करित होते. पोलिसांनी आरोपींकडून तीन रेमडेसिवीर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.

मंदार अनंत भालेराव (29, रा. शिवाजीनगर, बारावी योजना), अभिजीत नामदेव तौर (33, रा. मोती अपार्टमेंट, सहयोगनगर) अशी मेडीकल चालकांची तर अनिल ओमप्रकाश बोहते (40, रा. मोर्य मंगल कार्यालयाजवळ शिवजीनगर) असे घाटीतील चतुर्थ श्रेणीत काम करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे. आरोपींना रविवारपर्यंत दि.18 पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. काळे यांनी दिले.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज (55) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन हे सहज उपलब्ध होत नसल्याने आरोपी मंदार भालेराव हा आर्थिक फायद्यासाठी एक इंजेक्शन 14 ते 15 हजारांच्या चढ्या भावाने विक्री करित आहे. तेव्हा पोलिसांनी एका पंटरच्या मदतीने मंदार भालेराव याच्याशी संपर्क साधत त्याच्याकडे इंजेक्शन मागणी केली. तेव्ळा तो इंजेक्शन देण्यासाठी तयार झाला. पोलिसांनी 500 रुपयांच्या तीस नोंटावर पेन्सीलने स्वाक्षर्‍या केल्या. मंदारला फोन करुन पैसे घेण्यासाठी बोलावले. त्यावर मंदारने पंटरला सुतगिरणी चौकात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पंटर सुतगिरणी चौकात गेला असता मंदारने त्यांच्याकडून नोटांवर स्वाक्षर्‍या केलेले 15 हजार रुपये घेतले. तीस तासात इंजेक्शन तुम्हाणा जेथे म्हटले तेथे आणुन देतो, असे त्याने सांगितले.

आरोपी मंदारची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने शिवाजीनगर येथे मयुरेश्वर मेडीकल स्टोअर्स असल्याचे सांगितले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन हे अभिजीत तौर याच्या इंद्रा मेडीकलमधून 13,500 रुपयात खरेदी करुन आणल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आणखी दोन इंजेक्शन हे घाटी रुग्णालयात काम करणारा अनिल बोहते याने विक्रीसाठी दिल्याची कबुली देखील त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन, एक दुचाकी आणि मोबाइल जप्त केला.

मंदारने कबुल केलेल्या गुन्ह्यानूसार पोलिसांनी अभिजीत तौर आणि अनिल बोहते या दोघांना अटक केली. पोलिसांनी तौरकडे चौकशी केली असता, त्याने बीड येथून मित्राकडून रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या