रेमडेसिवीरची 25 हजारात विक्री; तिघे अटकेत

कार, रेमडेसिवीर इंजेक्शन, माेबाईल जप्त
रेमडेसिवीरची 25 हजारात विक्री; तिघे अटकेत

औरंगाबाद - Aurangabad

रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारात 25 हजारात विक्री करत असताना घाटीतील परिचारिकेचा पती अन्य दोघांवर गुन्हे शाखेने कारवाई केली. परिचारिका पती नितीन अविनाश जाधव (28, रा. कोहीनूर कॉलनी), त्याची पत्नी आरती नितीन जाधव आणि साथीदार गौतम देविदास अंगरक (36, रा. गादीया विहार) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून कार, रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाइल आणि रोख जप्त करण्यात आली आहे.

घाटीत आरती रामदास ढोले उर्फ आरती नितीन जाधव ही कोविड वार्डात परिचारिका आहे. तिचा पती नितीन जाधव हा कार चालक आहे. आरती ही कोविड वार्डात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन 25 हजारात काळ्याबाजारात साथीदार गौतम अंगरक याच्या मदतीने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून बुधवारी विटस हॉटेल ते पीरबाजार या रस्त्यावर पकडले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंगरक याने दहा जणांना इंजेक्शनची विक्री केल्याचे त्याच्या मोबाइलवरील संभाषणावरुन समोर आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com