Monday, April 29, 2024
HomeUncategorizedराज्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटचा दिलासा

राज्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटचा दिलासा

औरंगाबाद – aurangabad

राज्यातील विविध जिल्ह्यामधील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना (Medical Officer) मुंबई (mumbai) आणि औरंगाबाद मॅटने अंतरिम आदेशाद्वारे दिलासा दिला आहे. संबंधितांच्या सेवा मॅटच्या अंतिम निकालास अधीन राहणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने (State Public Service Commission) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली असली तरी मॅटचा अंतिम निकाल लागेपर्यंत २९ डॉक्टरांना कामावरून काढायचे नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई मॅट कार्यक्षेत्रातील १९ आणि औरंगाबाद मॅट कार्यक्षेत्रातील १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ वर्षानंतर जुलै २०२२ मध्ये जाहिरात प्रकाशित केली होती. तात्पुरत्या सेवेत वर्षानुवर्षे या विभागात कार्यरत असलेल्या एकूण २९ वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. यातील १९ वैद्यकीय अधिकारी यांनी मुंबईच्या मॅटमध्ये तर १० अधिकारी यांनी औरंगाबाद मॅटमध्ये अँड. प्रीती बानखेडे यांच्यावतीने याचिका दाखल करून तात्पुरत्या नियुक्त्‌या रद्द करू नये यासाठी विनंती केली. मॅटच्या दोन्ही खंडपीठांनी प्रकरणात राज्य शासनाला नोटीस बजावून राज्याच्या लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध करून जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या २९ वैद्यकीय अधिकारी यांचे मॅटमध्ये दाखल मूळ अर्ज निकाली निघेपर्यंत त्यांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या