'अनंत स्मृती' स्मरणिकेचे प्रकाशन

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा
'अनंत स्मृती' स्मरणिकेचे प्रकाशन

औरंगाबाद - aurangabad

आकाशवाणीचे (Radio) निवृत्त उद्घोषक ग्रंथ संग्राहक आणि साहित्यिक अनंत काळे यांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या अनंत स्मृती या स्मरणिकेचे प्रकाशन आणि मराठी रंगभूमी दिनानिमित्त "भारतीय रंगभूमीचे प्राचीनत्व" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

'अनंत स्मृती' स्मरणिकेचे प्रकाशन
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

अनंत काळे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृती जपणारा अनंत स्मृती हा अंक शनिवारी (५ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी, सरस्वती भुवन परिसर येथे प्रकाशित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. छाया महाजन असून प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर उपस्थित राहणार आहे. 

या कार्यक्रमात मराठी रंगभूमी दिनानिमित्त आकाशवाणीचे निवृत्त ज्येष्ठ उद्घोषक आणि साहित्यिक लक्ष्मीकांत धोंड यांचे ''भारतीय रंगभूमीचे प्राचीनत्व'' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संपादकीय मंडळातर्फे डॉ. अशोक वाकोडकर ,प्राचार्य प्रदीप जबदे ,अशोक अदापुरे, नीता पानसरे, अमृता काळे, डॉ. आरतीशामल जोशी आणि प्रकाश अशोक कुमठेकर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com