पुस्तक विक्रीला 'आवश्यक सेवा' म्हणून मान्यता द्या

औरंगाबाद खंडपीठात याचिका
पुस्तक विक्रीला 'आवश्यक सेवा' म्हणून मान्यता द्या

औरंगाबाद - Aurangabad

शिक्षणाला मूूलभूत हक्काचा दर्जा आहे. मग ज्या पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षणाचा हक्क प्रत्यक्षात बजावला जातो ती पुस्तके विकणे (Selling books) आवश्यक सेवेचा भाग समजला पाहिजे. यामुळे पुस्तकांना आवश्यक वस्तू' म्हणून मान्यता द्यावी आणि पुस्तक विक्रीला "आवश्यक सेवा' म्हणून यादीत समावेश करावा अशी मागणी मराठी पुस्तक परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल याचिकेत केली आहे.

मराठी प्रकाशक परिषदेची १९७५ मध्ये स्थापना झाली असून राज्यातील २५० हून अधिक प्रकाशक याचे सदस्य आहेत. लॉकडाऊनमुळे पुस्तके व प्रकाशकांची दुकाने बंद करावी लागली. मात्र, पुस्तक विक्री बंद करणे चूकीचे असून पुस्तके माणसाचे मित्र आहेत. पुस्तकातून माणसाला भावनिक, मानसिक व सकारात्मक आधार मिळतो. या भावनेतून पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे व मनोविकासचे अरविंद पाटकर यांनी मराठी प्रकाशक परिषदच्यावतीने अॅड. असीम सरोदे आणि अॅड. अजिंक्य उडाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि पी. के. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

...तर पुस्तक विक्री अत्यावश्यक सेवा

पुुस्तकांना आवश्यक वस्तू आणि पुस्तक विक्रीला अावश्यक सेवा म्हणून मान्यता मिळावी. एसेंशीअल सर्व्हिस मेंटनेन्स ऍक्ट १९६८ च्या कलम २ (१) (अ) (९ ) नुसार केंद्राने त्याचा आवश्यक सेवेच्या यादीत समावेश करावा, तसेच पुस्तके जीवन जगण्याचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य अंग असल्याचे न्यायालयाने अधोरेखित करावे अशी मागणी अॅड.सरोदे यांनी केली. पुस्तकांचे वाचन प्रगतीकडे नेणारी लोकशाहीसाठी पूरक प्रक्रिया आहे, असेही याचिकेत नमूद आहे.

माय मराठीची सेवा

ही याचिका केवळ एक खटला नसून ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी आहे. माय मराठीची सेवा घडावी यासाठी नि:शुल्क याचिका लडत आहे. केरळ सरकारने पुस्तके आणि पुस्तक विक्री आवश्यक सेवा असल्याचे मान्य केले आहे. राज्यानेही तसा निर्णय घेवून मराठी वाचन संस्कृती जपण्यास प्रेरणा द्यावी.

-ॲड.असीम सरोदे, याचिकार्त्यांचे वकील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com