Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमोठी बातमी ! २००० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद; 'या' तारखेपर्यंत राहाणार...

मोठी बातमी ! २००० रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद; ‘या’ तारखेपर्यंत राहाणार वैध

मुंबई | Mumbai

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

- Advertisement -

मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.

नाना पटोलेंचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले, मविआत…

२३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे की, बँकांनी २ हजार रुपयांची नोट ग्राहकांना देऊ नये तसेच ती चलनातही आणू नये. येत्या २३ मे पासून २ हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहेत. जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा या बँकेतून बदलून मिळू शकतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

“भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी,” असे आरबीआयने म्हटले आहे.

दरम्यान, नोटा बदलण्यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या