Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedपहिल्या आवृत्तीतील दुर्मीळ ‘हॅरी पॉटर’ लिलावात

पहिल्या आवृत्तीतील दुर्मीळ ‘हॅरी पॉटर’ लिलावात

मुंबई – Mumbai

मुलाला वाचनाची गोडी लागावी म्हणून आणलेल्या पुस्तकांना लिलावात मिळू शकणार्‍या लाखो रुपये किमतीने ‘त्यांना’ आश्चर्यचकीतच केले.

- Advertisement -

इंग्लंडमधील हवाई वाहतूक क्षेत्रातून निवृत्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी सन 1999 मध्ये हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोन ही पुस्तके विकत घेतली. ही दोन्ही पुस्तके पहिल्या आवृत्तीतील असून दुर्मीळ आहेत. या पुस्तकांना हजारो पाउंड, अर्थात लाखो रुपयांची किंमत मिळू शकते हे समजताच त्यांना धक्काच बसला.

‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाची पहिली पुट्ठे बांधणीची आवृत्ती केवळ 500 पुस्तकांची होती. ती सन 1997 मध्ये प्रसिद्ध झाली. सध्या दुर्मीळ झालेलय या पुस्तकाचा ‘हॅन्सर ऑॅक्शनिअर्स’ मार्फत दि. 13 ऑॅकटोबर रोजी लिलाव केला जाणार आहे. अपेक्षित किंमत आहे साडे अठ्ठावीस लाख रुपये ! मात्र, हे पुस्तक सुस्थितीत असल्याने त्याला तब्बल साडेसत्तेचाळीस लाखांची किंमतही मिळू शकते.

आपल्याकडे असलेली पुस्तके इतकी किमती आहेत याची मला कल्पनाही नव्हती. मी घेतलेले पुस्तक प्रसिद्ध होताच लगेच विकत घेतलेही नव्हते. मात्र, ‘हॅन्सर’ मार्फत पहिल्या आवृत्तीतील ‘हॅरी पॉटर’ पुस्तकाचा लिलाव झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी कंपनीचे ग्रंथ तज्ज्ञ जिम स्पेन्सर यांची भेट घेऊन त्यांना पुस्तक दाखविले. ते पाहून त्यांनाही धक्का बसला.

हॅरी पॉटरच्या पहिल्या आवृत्तीची केवळ 500 पुस्तके छापण्यात आली. त्यापैकी 300 शाळा, वाचनालयांकडे आहेत. उरली केवळ दोनशे. त्यापैकी या वर्षभरात माझ्याकडे आलेले हे चौथे पुस्तक आहे. पुस्तक संग्रहकांसाठी ती पवित्र ग्रंथांसारखी अमूल्य आहेत, असे स्पेन्सर म्हणाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या