धक्कादायक : एड्सग्रस्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार
pune crime
अन्य

धक्कादायक : एड्सग्रस्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एड्सग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यानेच....

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधि) Pune - एड्सग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यानेच या संस्थेत एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. एका समाजसेवकाने याप्रकरणी तक्रार दिली असून संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडीतील बालाजीनगर परिसरात एक एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणारी संस्था आहे. यातील आरोपी या संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. मार्च महिन्यात पीडित मुलीला उपचारासाठी या संस्थेत ठेवण्यात आले होते. या दरम्यानच्या कालावधीत आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मदने करीत आहेत.

तक्रारदार व्यक्ती सामाजिक कार्यकर्ती असून ‘रेड लाइट एरिया’त समाज प्रबोधन करण्याचे काम करीत असते. पीडित मुलीला औषधोपचारासाठी मार्गदर्शन करीत असताना तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com