ऐन दिवाळीत सुटे खाद्य तेलाची सर्रास विक्री

औरंगाबाद – aurangabad

ऐन दिवाळीत औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर सुटे खाद्य तेल विक्री होत असल्याचे समोर येत आहे. भेसळ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, शहर परिसर आणि ग्रामीण भागातील व्यापारी बंदीला केराची टोपली दाखवून सरीस सुटे खाद्य तेल विक्री करत आहेत. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्यास धोका निमीण होण्याची शक्‍यता आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त तेलाची विक्री वाढल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील जुना मोंढा, टीव्ही सेंटर, जाधववाडी बाजार, मुकुंदवाडी, गुंठेवारी व झोपडपट्टी भाग, छावणी, ज्योतीनगर आदी परिसरातील दुकानात पाहणी केली. तेव्हा किरकोळ विक्रेते सरीस सुटे तेल विक्री करत असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील दुकानातून सुटे तेल मोठ्या प्रमाणावर विक्री होते. घरगुती वापर, ढाबेचालक, हॉटेल चालक, रस्त्यावर आम्लेट, कचोरी, समोसा, भजे तळण्यासाठी सुट्या तेलाचा वापर होत असल्याचे दिसून येते.  दिवाळीमुळे खादूयतेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे भावही चांगला मिळतो. मात्र, भेसळयुक्त खाद्य तेलामुळे नागरिकांचे आरोग्याला अपाय होण्याची भीती निमीण झाली आहे. सध्या सोयाबीन तेल १४५ रुपये, सुपर पाम १२५, शेंगदाणा १८० तर करडी तेल २०० रुपये लिटरप्रमाणे विक्री होत आहे. तसेच विविध कंपन्याचे पॅकींग तेल घेतल्यास त्यामध्ये जवळपास १०० मिलिलिटर तेल कमी येत असल्याने ग्राहक सुट्या तेलाचा वापर करतात.

भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे तेलामुळे अनेकांना थायरॉईड, दमा, खोकला, ब्लड प्रेशश (बीपी) आदी आजारासह शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच साखरेचा आजार जडलेल्या रुग्णांना देखील भेसळयुक्त तेलामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

कारवाई करणार
सुटे तेल विक्रीवर बंदी असून आम्ही कारवाई करत आहोत. तुम्हाला सुटे तेल विक्री कुठे चालू असल्याचे दिसले तर त्याविषयी आम्हाला माहिती द्यावी. निश्‍चित कारवाई करू. सुट्या तेलात भेसळ असण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे ग्राहकांनी आरोग्य जपण्यासाठी या किरकोळ तेल विक्रीच्या दुकानातून खरेदी करू नये. तेल कंपन्यांनी नियम पाळावे. पॅकबंद तेल विकण्याच्या आदेशाचे पालन करावे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांनी नमूद केले.