रमेश नारायण यांच्या 'अ डिफरंट रूट टू सक्सेस' पुस्तकाचे प्रकाशन

रमेश नारायण यांच्या 'अ डिफरंट रूट टू सक्सेस' पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जाहिरात उद्योगातील सर्वात जास्त पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी एक असलेल्या रमेश नारायण यांच्या 'अ डिफरंट रूट टू सक्सेस' (Different Route to Success) या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम रोटरी क्लब ऑफ बॉम्बेला देण्यात येणार आहे. ही रक्कम भविष्य यान (विद्यार्थी संवर्धन) Bhavishya Yaan (student enrichment), आनंद यान (ज्येष्ठांची काळजी) Ananda Yaan (elder care), एकात्मिक ग्रामीण विकास यासारखे व्यापक कार्यक्रम चालविण्यासाठी हातभार लावणार आहे....,

रमेश नारायण (Ramesh Narayan) त्यांच्या या पुस्तकाबाबत म्हणतात की , पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आयुष्यातील घटना आणि वेगवेगळया टप्प्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजवरचे अनेक प्रकारचे अनुभव यात मांडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाचकांसाठी ही एक सुखद भेट असेल. व्यावसायिक जीवनाचे एक विहंगम दृश्य या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

ते ५० व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य जाहिरात उद्योगाकडे वळवले. ते इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन इंडिया चॅप्टरचे (IAA) अध्यक्ष आणि IAA च्या जागतिक मंडळावर APAC चे परिसर संचालक होते. कोची येथील संस्मरणीय IAA वर्ल्ड कॉंग्रेस २०१९ च्या कोअ र टीमच्या पाच सदस्यांपैकी ते एक होते.

निवृत्त होण्यापूर्वी रमेश हे सर्वात तरुण व्यक्ती होते ज्यांनी दोन वर्षे जाहिरात क्लब, अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI), संचालक ऑडिट ब्यूरो ऑफ सर्कुलेशन आणि राष्ट्रीय वाचक सर्वेक्षण परिषद, अध्यक्ष नियोजन समिती AdAsia 2003 आणि Execom सदस्य आशियाई फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (AFAA) अशी अनेक पदे भूषवली.

ते म्हणतात, त्यांनी अनेक एनजीओ (NGO) आणि पर्यावरण, शिक्षण, वृद्धांची काळजी आणि ग्रामीण उन्नतीचा समावेश असलेल्या काही प्रकल्पांशी संबंधित अशा सामाजिक क्षेत्रात कार्य केले. त्याचाही उल्लेख आणि कामगिरी यात आहे. त्यांचे सर्वात मोठे बक्षीस म्हणजे ते ज्या नाविन्यपूर्ण उपक्रमांशी जोडले गेले आहेत. अशा सामाजिक कार्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com