Friday, May 10, 2024
HomeUncategorizedराज ठाकरेंची सभा होणारच; औरंगाबादला छावणीचे स्वरूप

राज ठाकरेंची सभा होणारच; औरंगाबादला छावणीचे स्वरूप

औरंगाबाद – aurangabad

मनसेप्रमुख राज ठाकरेची (Raj Thackeray) सभा तीनच दिवसांवर आली असताना अजून (police) पोलिसांनी परवानगी दिलेली नसल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभेला परवानगी मिळविण्यासाठी (Maharashtra Navnirman Sena) मनसेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी मनसे नेते (Bala Nandgaonkar) बाळा नांदगावकर यांनी (Commissioner of Police) पोलिस आयुक्तांची भेट घेत सभेला परवानगीची विनंती केली. दरम्यान, सभेसाठीची तयारी पूर्णत्वाकडे असल्याचे एकदंर चित्र आहे. प्रक्षोभक भाषण न करण्याच्या अटीवर परवानगी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

- Advertisement -

शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी सभा घेण्याचे राज ठाकरेंनी जाहीर केल्यापासून राजकारण ढवळून निघत आहे. सभेमुळे सामाजिकशांतता बिघडू शकते, असे म्हणन विविध पक्ष संघरयांकरन विरोध केला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अजून सभेला परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे उत्साही मनसैनिकांची जोरदार तयारी सुरू आहे. सभेसाठी छापण्यात आलेल्या विशेष निमंत्रण पत्रिका घरोघरी वाटल्या जात आहेत. सभास्थळावर मंटप उभारणीचे काम जोरात सुरू आहे. राज ठाकरेंच्या सभेचे टिझरही मनसेकडून लाँच करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नसल्याने मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी औरंगाबाद दौर्‍यावर येत पोलिस आयुक्‍त निखिल गुप्तांची भेट घेत चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, की पोलिस आयुक्तांना सभेला परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, उद्या निर्णय कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसआरपीएफ मैदानात

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणार्‍या जाहीर सभेच्या बंदोबस्तासाठी (Commissioner of Police Dr. Nikhil Gupta) पोलिस आयुक्‍त डॉ.निखिल गुप्ता यांनी राज्य राखीव पोलिस दलाकडे बंदोबस्ताची मागणी नोंदविली होती. त्यानुसार, राज्य राखीव पोलिस दलाने सहा कंपन्या देण्याची सहमती दर्शविली आहे. जालना आणि औरंगाबाद एसआरपीएफ’च्या प्रत्येकी तीन अशा सहा कंपन्या ३० एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत शहरात दाखल होतील. विशेष म्हणजे, ३० एप्रिल ते १ मे या एका दिवसासाठीच हा बंदोबस्त मागविला आहे. राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत जालना आणि औरंगाबाद समादेशकांना आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या