राज ठाकरे हाजीर हो...!

औरंगाबाद कोर्टात यावे लागणार
राज ठाकरे हाजीर हो...!

औरंगाबाद - Aurangabad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (Maharashtra Navnirman Sena chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या सभेत नियमांचे उल्लंघन (Violation of rules in the meeting) केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी (City Chowk Police) गुरुवारी नोटीस (notice) बजावली. राज ठाकरे यांनी शहरात जोरदार सभा घेतली होती. सभेपूर्वीच राज ठाकरेंना पोलिसांकडून काही नियम घालून देण्यात आले होते. या नियमांचे राज ठाकरेंकडून उल्लंघन झाल्याने त्यांना ही नोटीस बजावली आहे.

गुन्ह्याचे दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना व्यक्तिशः न्यायालयातही हजर राहावे लागणार आहे. पोलिसांनी या पार्श्वभूमीवरच त्यांना ही नोटीस पाठवली आहे. स्पीड पोस्टाने सदर नोटीस त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी १ मे रोजी जाहीर सभा घेतली होती. मनसेने यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. यासभेचे संपूर्ण शहरासह मराठवाड्यात ब्रॅडिंग करण्यात आले.

मात्र, राज ठाकरेंना घालून दिलेल्या अटी-शर्तींचे सभेत उल्लंघन झाले. त्यामुळे याप्रकरणी सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरेंविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभेत मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होती. त्याचप्रमाणे त्यांनी सभेत आवाजाची मर्यादा ओलांडली, असे आरोप पोलिसांनी केले आहेत. पोलिसांनी सभेचे संपूर्ण फुटेज तपासल्यानंतर गृह मंत्रालयाला या संदर्भातील अहवाल पाठवला होता. त्यानंतरच राज ठाकरेंविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com