आता प्रत्येक शाळेत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'

अहवालही द्यावा लागणार 
आता प्रत्येक शाळेत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'

औरंगाबाद - aurangabad

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य, कायम विनाअनुदानित (School) शाळांनी (Rain water) पावसाचे पाणी वाया जाऊ न देता शालेय इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' (Rainwater Harvesting) करून जमिनीत, विहिरीत अथवा (Borewell) बोअरवेलमध्ये साठवावे, असे आदेश माध्यामिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच शाळेत वृक्षारोपणही शाळांनी करायचे असून, या दोन्ही उपक्रमांचा अहवाल शिक्षण विभागास पाठवायचा आहे.

भूजल पुनर्भरण व्हावे यासाठी बांधकामास परवानगी देतानाच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करणे अनिवार्य याबाबतचा नियम आहे. परंतु, आजवर कागदावर राहिलेला हा नियम शाळा असो वा खासगी, इमारतींच्या बाबतीत कागदावरच राहिला आहे. परंतु, पावसाळा सुरू होताच याची आठवण प्रशासन आणि शिक्षण विभागालाही झाली आहे.

पावसाळा सुरू होताच मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. तर जिल्ह्यात जवळपास दोनशे गावे अशी आहेत जिथे कायम पाणीटंचाई असते. फक्त दोन वर्षांत पाऊस चांगला असल्याने पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु, पिण्याच्या पाण्याच्या काही भागात कायम समस्या असतात. ही बाब लक्षात घेऊन शाळांनी स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शाळांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबरोबरच वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे.

दिलेल्या आदेशात शिक्षणाधिकारी देशमुख यांनी म्हटले आहे की, शाळेत व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. तसेच शालेय इमारतीवरील पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत, विहिरीत अथवा बोअरवेलमध्ये साठविण्याची कार्यवाही तातडीने करावी व आपला अहवाल शाळेच्या नावासह मुख्याध्यापकांनी पगोटोसह शिक्षण निभागाला सादर करावा. याबरोबरच रोपांची संख्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेल्या खोल्यांची संख्याही पाठवायची असून, याचा खर्च शाळांनी स्वतः करायचा आहे. या कामांची योग्य ती दखल घेतली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com