राज्यात आज विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा

नद्यांना पुराचा धोका
राज्यात आज विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा

औरंगाबाद (Aurangabad)

राज्यात तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या शेतकरी पीक काढणीच्या घाईत आहेत. त्यातच आता मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने गावागावात मोठे नुकसान झाले आहे. आज राज्यभरात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा (Rain warning) देण्यात आला आहे. 

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सोयगाव (Soygaon) तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या भागातील गावात पाणी शिरलं आहे. महापुराचा धोका निर्माण झाला आहे. गावागावात शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोयगाव भागातील शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली आहे. यंदा पाऊसकाळ जोरात आहे.

मराठवाड्यातील पिकं सुद्धा चांगल्या प्रमाणात आली आहेत. पण आता काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता नदी आणि नाल्यांमध्ये पूराचा धोका वाढला आहे.

राज्यात आज पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्वत्र गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.