ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पथकांची नियुक्ती

चितेगावची आर. एल. स्टील कंपनी अधिग्रहित
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पथकांची नियुक्ती

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णालयाच्या, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तात्काळ ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पैठण तालुक्यातील चितेगाव येथील आर. एल. स्टील कंपनी अधिग्रहित करण्यात आली आहे. ही कंपनी आता ऑक्सिजन प्लांटवरून शहर, जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजन पुरवठा करेल. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पथकांचीही नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये , हणून जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. कोरोना बाधितांवर उपचार करणारे डीसीएच व डीसीएचसी रूग्णालयांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागत आहे.

मार्च महिन्यात वाढलेली ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता भविष्यात जिल्हयात व शहरात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जम्बो सिलेंडरच्या स्वरुपात ऑक्सिजन आकस्मिक आवश्यकतेप्रमाणे तत्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच शासनाने औद्योगिक कारणासाठी उत्पादित करण्यात येणार्‍या ऑक्सिजनच्या वापराबाबत फार्मास्युटिकल कंपन्या, लस उत्पादन कंपन्या व आवश्यक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन याव्यतिरिक्त उर्वरित सर्व साठा वैद्यकीय वापरास्तव उपयोगात आणण्यासाठी आदेशित केले आहे. यामध्ये निष्काळजीपणा अथवा दुर्लक्ष झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात बजावले आहे.

पहिल्या लाटेत कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यावेळी परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे यातून धडा घेत आता प्रशासनाने दुसर्‍या लाटेत गंभीर रूग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com