औरंगाबादेत कचरा डेपोचा प्रश्न चिघळला!

औरंगाबादेत कचरा डेपोचा प्रश्न चिघळला!

गावकऱ्यांनी ट्रक रोखले 

औरंगाबाद- Aurangabad

कचरा डेपो Garbage Depot प्रक्रिया प्रकल्पातील लिचड (घाण पाणी) वाहून शेतात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चिकलठाणा कचरा डेपो बंद पाडला. शेतकऱ्यांनी सकाळीच प्रकल्पात प्रवेश करून कामकाज बंद पाडले. मुख्य प्रवेशद्वार बंद करीत शहरातून कचरा घेऊन आलेली वाहने बाहेरच रोखली. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई Guardian Minister Subhash Desai यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याकडेही या प्रकल्पाची तक्रार केली.

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी चिकलठाणा भागात दीडशे टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारला. सध्या शहरातील पन्नासहून जास्त वॉर्डांमधील कचरा दररोज याठिकाणी आणला जातो. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर लिचड म्हणजे घाण पाणी बाहेर पडते. या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने फार उपाययोजना न करता तळे तयार करुन त्यात सोडण्यात आले. शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पाण्यासोबत लिचड वाहून परिसरातील शेतात जात आहे. परिणामी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नुकसान होत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरी संतप्त झाले.

नीलेश कावडे, मुरलीधर कावडे, दत्ता गाजरे, बाबासाहेब दहिवडी, दिगंबर कावडे, भास्कर कावडे, अमोल कावडे, दिलीप रिठे, मारुती कावडे, ज्ञानेश्वर कावडे आदी शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजता प्रक्रिया प्रकल्पात जाऊन कामकाज बंद पाडले. प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केले. शहरातील कचरा घेऊन आलेली वाहने बाहेरच थांबविण्यात आली. दुपारपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने काही कचरा गाड्या पडेगाव प्रकल्पाकडे वळविण्यात आल्या.

गेल्या वर्षभरापासून आम्ही लिचडच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे Nandkishore Bhobe, Head, Solid Waste Department यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. पण त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधूनमधून हे लिचड शेतात येऊन सतत आमचे नुकसान होत आहे. आजही मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासून भोंबे यांच्याशी संपर्क करत आहोत, पण ते अजूनही इकडे आलेले नाहीत, ते फोनही घेत नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी मी आयुक्तांना सांगतो, तुमचा प्रश्न लवकरच सुटेल, असे आश्वासन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com