लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार
अन्य

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

अत्याचार आणि अंगावरील दागिने लुटल्या प्रकरणी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी)- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने एका महिलेला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार आणि तिच्या अंगावरील दागिने लुटल्या प्रकरणी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रामचंद्र बनसोडे असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला बसची वाट पाहत थांबलेळी असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बनसोडे याने या महिलेला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला होता.

घटनेनंतर पीडित महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून या महिलेनं रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या महिलेकडून माहिती जाणून घेतली. घटना मुंढवा परिसरात घडल्यामुळे गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितेला मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

आरोपीचं वय ५० ते ५५ च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता आणि त्याचा आकाहे संबंध नसल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबुल केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com