कोण होणार पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधीकारी
अन्य

कोण होणार पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधीकारी

जिल्हाधिकारी पदासाठी इच्छुकांचे जोरदार लॉबिंग; चौघांची नावे चर्चेत

Rajendra Patil Pune

पुणे|प्रतिनिधी|Pune

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हून नियुक्ती झाल्याने पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऐन कोरोनाच्या संकट काळात राम यांची बदली झाल्याने पुणे जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून सध्या चार जणांची नावं चर्चेत आहेत.

आयुष प्रसाद यांच्याकडे बारा तास जबाबदारी राहण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सोमवारी रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र नाव जाहीर होण्यास उशीर झाल्यास कोरोना नियंत्रणावर परिणाम होण्याची भीती आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी सध्या राजेश देशमुख सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. राजेश देशमुख यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी काम केलं आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं नाव चर्चेत आहे. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचं नाव मागं पडलं असल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारच पालकमंत्री असलेल्या या ‘कोरोनाग्रस्त’ जिल्ह्याचा कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने उपाययोजना करण्यासाठी मर्यादा येणार आहेत. पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं महत्वाचं जिल्हा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्जीचा अधिकारी नियुक्त करण्यावर भर आहे. आपल्या मर्जीतील जिल्हाधिकाऱ्यांसाठी अनेक लोकप्रतिनिधींची फिल्डींग लावली. त्याचबरोबर अनेक इच्छुक जिल्हाधिकाऱ्यांची नेत्यांकडे लॉबिंग सुरु केलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com