Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपाचशे रुग्णवाहिका अधिग्रहितसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओला प्रस्ताव

पाचशे रुग्णवाहिका अधिग्रहितसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओला प्रस्ताव

पुणे|प्रतिनिधी|Pune

पुणे जिल्ह्यात करोनाचा करोनावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. दररोज करोना बाधितांची वाढणारी संख्या, त्यामुळे अपुऱ्या पडणाऱ्या खाटा, व्हेंटीलेटर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आणीबाणीच्या वेळी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होणे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एक प्रस्ताव आरटीओला दिला आहे. त्या प्रस्तावानुसार पाचशे रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या ६०-६५ बसेसचा रुग्णवाहिकांसाठी वापर करण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात रुग्णवाहिका संख्या वाढवण्याचा प्रयत्न सध्या स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे. जिल्ह्यात सध्या ४६१ सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पुणे शहरात २१५, पिंपरी चिंचवड ११५ आणि ग्रामीण भागात १३१ रुग्णवाहिका आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक रुग्णालयाकडे स्वतःच्या २ ते ४ रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे सध्या रुग्णवाहिका पुरेशा आहेत.

मात्र, करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिका वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागात १३१ सरकारी रुग्णवाहिका असून आणखी रुग्णवाहिकांची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या सबळ असणाऱ्या रुग्णवाहिकांना ग्रामपंचायत स्वतःच्या गावासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या