मुख्यमंत्र्याचा पुणे दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण
अन्य

मुख्यमंत्र्याचा पुणे दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

Rajendra Patil Pune

पुणे|प्रतिनिधी|Pune

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) पहिल्यांदाच पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात ते पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या करोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

पुण्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ दिखाव्यासाठी आहे, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानं राज्य सरकारकडून भेदभाव केला जातोय.

महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०० कोटींचा खर्च केला. मात्र राज्य सरकारने केवळ तीन कोटी रुपयांची मदत केली. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकीचं नाटक न करता ५०० कोटींची मदत जाहीर करावी, असा घणाघात जगदीश मुळीक यांनी केला.

पुण्यात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात ५० हजार पेक्षा जास्त करोनाबाधितरुग्ण आढळले आहेत. मात्र, पुण्यात बेडसुद्धा उपलब्ध होत नाहीत. सरकारने योग्य पद्धतीने पुण्याची परिस्थिती हाताळली नाही. मुख्यमंत्र्यांचं पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं, असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला.

सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन धीर देणं गरजेचं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पिंजून काढलं. त्यामुळे लोकांना आजही मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस असल्याचं वाटतं, असं जगदीश मुळीक म्हणालेत.

Deshdoot
www.deshdoot.com