Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedग्रामीण भागातील रुग्णालयांना आरोग्य सुविधा पुरवा

ग्रामीण भागातील रुग्णालयांना आरोग्य सुविधा पुरवा

औरंगाबाद – Aurangabad

ग्रामीण भागातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी आरोग्य सोयी सुविधांचा अभाव असून कोरोनाच्या संकट काळात याठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या डेडीकेट कोविड हेल्थ सेंटरला भेट दिली. कोरोना बाधित रूग्णांवर कशा पध्दतीने उपचार केल्या जातात, याठिकाणी कोणकोणती उपकरणे उपलब्ध आहेत, कोणकोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे, डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची संख्या किती आहे आदींचा आ.सतीश चव्हाण यांनी आढावा घेतला.

यावेळी याठिकाणी जेम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, बायपॅप मशिन्स, मेडिसीन ट्रॉली आदी उपकरणांची आवश्यकता असल्याचे आ.सतीश चव्हाण यांच्या निदर्शनास आले. लागलीच आ.सतीश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून वैजापूर येथील डेडीकेट कोविड हेल्थ सेंटरला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी देखील आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन-तीन दिवसात याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाला देखील मोठा विळखा घातला आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची वाढत जाणारी संया निश्चितच चिंताजनक आहे. ग्रामीण भागात कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्या जात असून नागरिक आजार अंगावर काढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे वेळीच उपचार घ्यावेत असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या