नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे-प्रधान सचिव संजीव जयस्वाल

नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे-प्रधान सचिव संजीव जयस्वाल

औरंगाबाद - aurangabad

ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरात स्वच्छ व आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ही योजना अधिक प्रमाणात यशस्वी होण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रूटी दूर कराव्यात, पाणी स्त्रोत विकास, साठवण आणि पूरक पाणी स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच पाण्याचे पुर्नजीवन व बळकटीकरण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद प्रादेशिक विभागाअंतर्गत जिल्ह्यातील जल जीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशनची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस भूजल सर्वेक्षण आयुक्त चितांमणी जोशी, मिशन संचालक ऋषीकेश यशोधर, अभय महाजन याबरोबरच औरंगाबाद जिल्हयाचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जिंतेद्र पापळकर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी अरंविद लोखंडे यांची उपस्थिती होती. तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्यासह जालनाचे मनोज जिंदाल, परभणीचे शिवानंद टाकसाळे, बीडचे श्री पवार, लातूरचे अभिनव गोयल, नांदेडच्या श्रीमती वर्षा ठाकूर, हिंगोलीचे संजय दैने, उस्मानाबादचे राहुल गुप्ता, यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती

होती.

जायस्वाल पुढे म्हणाले जलजीवन मिशन योजनेच्या अंमजबजावणी मधील त्रूटी दूर करुन पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणी स्त्रोत विकासासाठी क्षेत्रीय स्तरावर भेटी व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. अपवादात्मक स्थितीसाठी पाणी स्त्रोत म्हणून इतर पाण्याचा वापर करण्याबरोबरच दुर्गम व डोंगराजवळ भागात सोलार उर्जेचा वापर करुन पाणीपुरवठा करण्यासाठीचे नियोजन करताना लोकसंख्या व अंदाजित खर्च याबाबतचे नियोजन करुन कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. टँकरमुक्त मराठवाडा करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाने नियोजन करुन पाणी गळती थांबवण्यसाठी प्रशिक्षण, किमान गावाची निवड करुन पाणीपुरवठा योजनेचे मॉडेल गाव करताना लोकप्रतिनिधींनी दत्तक घेतलेल्या गावाचा प्राधान्याने विचार करावा, असे संजय जयस्वाल यांनी सांगितले.

जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाची अंमलबजावणी संदर्भात जिल्हानिहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला. याचमध्ये जलजीवन मिशनची उद्दिष्टपूर्ती, मराठवाडा वॉटर ग्रीड, पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, जलसुरक्षक प्रशिक्षण, वीजबील प्रलंबित असल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधीचा उपयोग करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जयस्वाल यांनी सूचित केले. त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून प्रशिक्षण शौचालय बांधणी व वापर याबाबत विभागाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com