Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद मनपाची पत घसरली ; निधी मिळवण्यासाठी मालमत्ता गहाण

औरंगाबाद मनपाची पत घसरली ; निधी मिळवण्यासाठी मालमत्ता गहाण

औरंगाबाद – aurangabad

(Smart City) स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी (Municipal Corporation) महापालिका राष्ट्रीय बँकेकडून (National Bank) २५० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. त्यासाठी १५ मालमत्तांचे मूल्यांकन करून त्या बँकेकडे गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाल्यानंतर पाच वर्षांत एक हजार कोटींचा निधी विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यात केंद्राचा हिस्सा ५०० कोटी, राज्याचा २५० कोटी आणि मनपाचा २५० कोटी रुपये आहे. केंद्राने आतापर्यंत २९४ कोटी तर राज्य सरकारने १४७ कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित निधी उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेने आपल्या वाट्याचा हिस्सा भरावा लागेल. तोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळणार नसल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे मनपाने हा निधी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीकडे भरण्यात आला आहे. उर्वरित निधीसाठी कर्ज घेण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेकडून २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यास किती व्याजदर लागेल, याची चाचपणी केली जात आहे. सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँकेकडून ते घेतले जाईल. त्यासाठी मनपाच्या १५ मालमत्तांचे मूल्यांकन करून त्यांची यादी बँकेकडे सादर केली जाईल. तसेच इतर कागदपत्रे दिली जातील. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २५० कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे सूत्रांनी सांगितले

- Advertisment -

ताज्या बातम्या